ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन दुःखदायक आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणलं. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही ‘हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले. बजाज कुटुंबीयांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही श्री वळसे पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!