भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । महाराष्ट्राच्या औद्योगिकरणासाठी मोलाचे योगदान देणारे उद्योगपती राहुल बजाज यांना आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे संपूर्ण देशातील प्रमुख क्षेत्र आहे. राज्याला हे स्थान मिळण्यामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगसमुहामार्फत केलेले काम खूप मोलाचे आहे. बजाज ऑटोचे पन्नास वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे – पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची अपरिमित हानी झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!