ट्रेंडलाइनने स्टारफोलियो लॉन्च केला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । मुंबई । गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी भारतातील आघाडीचा अनॅलिटीक्स प्लॅटफॉर्म ट्रेंडलाइनने सादर केला आहे स्टारफोलियो, हे एक बास्केट-गुंतवणूक उत्पादन आहे आणि गुंतवणूकदार याचा मोफत लाभ घेऊ शकतील. स्टारफोलियोसह गुंतवणूकदार फीचर्ड स्टारफोलियो बास्केट खरेदी करू शकतात किंवा आपले स्वतःचे बास्केट तयार करू शकतात. ते बास्केटमध्ये अजून जास्त स्टॉक किंवा ईटीएफ आणू शकतात किंवा तिथून कमी करू शकतात आणि स्टॉप लॉस व रीबॅलन्सिंग रिमाइंडर देखील सेट करू शकतात. यामध्ये आयआयएफएल, ५पैसा, फायर्स, मोतीलाल ओसवाल, जेरोधा आणि एंजल वन. हे सहा कनेक्टेड ब्रोकर्स आहेत ज्यांच्या मार्फत गुंतवणूकदार बास्केट्सची खरेदी किंवा विक्री करू शकतात. व्यवसायांसाठी स्टारफोलियो एक विजेट आणि एपीआय प्लगइन्स स्वरूपात देखील उपलब्ध आहे.

ट्रेंडलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्री. अंबर पबरेजा यांनी सांगितले, “आमच्या गुंतवणूकदारांसाठी अनॅलिटीक्सपासून ट्रँजॅक्शन्सपर्यंत सर्व उत्पादने प्रस्तुत करण्यासाठी आम्ही स्टारफोलियोची सुरुवात केली आहे, जेणेकरून ते ट्रेंडलाइनवर आपला पोर्टफोलियो अजून जास्त सहजपणे मॅनेज करू शकतील. आता गुंतवणूकदार ट्रेंडलाइनवर लॉग ऑन करून आपले स्क्रीनर्स, वॉचलिस्ट किंवा स्टॉक लिस्टची सहजपणे खरेदी किंवा विक्री करू शकतात, यामध्ये ते आपल्याला हव्या त्या ब्रोकरचा उपयोग करू शकतात.”

गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी भारतातील अनॅलिटीक्स प्लॅटफॉर्म ट्रेंडलाइनने गेल्या वर्षभरात वेगवान वृद्धी साध्य केली आहे, त्यांच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर १२ महिन्यांमध्ये ३०० मिलियनपेक्षा जास्त पेज/स्क्रीन व्ह्यू मिळाले आहेत. गुंतवणूक क्षेत्रामध्ये ही भारतातील आघाडीच्या ५० वेबसाईट्सपैकी एक आहे. नुकतेच गूगल प्ले स्टोरवर लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेंडलाइन मार्केट्स ऍपला आधीच खूप चांगले रेटिंग्स आणि पाच लाखांहून जास्त डाउनलोड मिळाले आहेत.

ट्रेंडलाइनच्या बी२बी बिझनेसच्या ग्राहकांमध्ये भारतातील प्रमुख ब्रोकरेजेस आहेत, यामध्ये आयसीआयसीआय सिक्युरिटीज, कोटक सिक्युरिटीज, एचडीएफसी सिक्युरिटीज, ५पैसा, मोतीलाल ओसवाल, आयआयएफएल, फायर्स, एसबीआय कॅपिटल, एडेलवीज आणि इतर अनेकांचा समावेश आहे. ट्रेंडलाइन आपल्या बी२बी ग्राहकांना दर महिन्याला ५०० मिलियनपेक्षा जास्त एपीआय आणि पेज व्ह्यू देते.

स्टारफोलियोसह थीमवर आधारित गुंतवणूक केली जाऊ शकते, एकाच कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पोर्टफोलियोचे मॅनेजमेंट आणि वेगवेगळ्या ब्रोकर अकाउंट्सवर पोर्टफोलियोचे मॅनेजमेंट करता येऊ शकते. उदाहरणार्थ, एक युजर ऑटो सेक्टरसारख्या थीममध्ये गुंतवणूक करत आहे. त्यासाठी गुंतवणूकदार सुरुवातीपासूनच ऑटो स्टॉकचे बास्केट बनवू शकतात किंवा स्टारफोलियो बास्केटमध्ये ट्रेंडलाइनवर त्यांनी बनवलेल्या ऑटो स्टॉकच्या वॉचलिस्टमधून एक्स्पोर्ट करू शकतात. एकदा त्यांनी बास्केटमध्ये सेव्ह आणि गुंतवणूक केली की त्यानंतर स्टॉकचे अनॅलिटीक्स त्यांना एकूण पोर्टफोलियोपेक्षा वेगळे मिळू शकतात. ट्रॅकिंग आणि तुलना करणे खूप जास्त सोपे होते.

ट्रेंडलाइन एक लाभदायक कंपनी आहे आणि स्थिर, टिकाऊ व्यवसायासाठी उत्पादनांना मार्केट-टेस्ट करणे हे पहिल्यापासून त्यांचे उद्दिष्ट आहे. ट्रेंडलाइनने स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड क्षेत्रात अत्याधुनिक उत्पादने बनवली आहेत, स्टॉक स्कोर्स, स्क्रीनर्स, बॅकटेस्टिंग, अल्फा अलर्ट्स (स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटाचे रिअल टाइम अलर्ट्स), स्टॉक इन्साईट्स, कंसेन्सस एस्टीमेट्स आणि अनॅलिस्ट कॉल्समध्ये प्रगत उत्पादने यांना यामध्ये सामील केले जाते. स्टारफोलियो हे या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आलेले सर्वात नवे उत्पादन आहे.


Back to top button
Don`t copy text!