फलटण बसस्थानकात ‘प्रवासी दिन’ उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
दरवर्षी रथसप्तमी दिवशी एसटी महामंडळाच्या आगारामध्ये ‘प्रवासी दिन’ साजरा करण्यात येतो. या दिवशी सूर्याचे अखंड भ्रमण सुरू असते, त्याचप्रमाणे प्रवाशांचा अखंड प्रवास सुरू राहावा म्हणून रथसप्तमी दिवशी ‘प्रवासी दिन’ साजरा करण्यात येतो. फलटण आगारातही या प्रवासी दिनानिमित्त सर्व प्रवाशांना शुभेच्छा देऊन मान्यवरांच्या हस्ते तीळगुळ व रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सातारा जिल्हा संघटक किरण बोळे, फलटण तालुका एस. टी. प्रवासी संघटनेचे प्रमुख प्रा. शिवलाल गावडे, फलटण आगार व्यवस्थापक रोहित नाईक, बसस्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, वाहक श्रीपाल जैन व एसटीचे अन्य अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!