फलटण आगाराच्या व्यवस्थापक वासंती जगदाळे यांची बदली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२३ | फलटण | राज्य परिवहन (एस.टी.) च्या सातारा विभागातील फलटण आगाराच्या व्यवस्थापक सौ. वासंती जगदाळे यांची आज बदली करण्यात आली आहे. त्यांची कोल्हापूर विभागातील चंदगड आगारात बदली झाली आहे. सौ. जगदाळे यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये फलटण आगाराचा कार्यभार स्विकारला होता.

केवळ आठ महिन्यांतच वासंती जगदाळे यांची फलटण आगारातून कार्यमुक्ती झाली आहे. नुकताच फलटण आगारातील ‘अष्टविनायक दर्शन यात्रे’तील तिकिटांच्या पैशांचा अपहार उघडकीस आला होता; त्यानंतर तातडीने करण्यात आलेल्या बदलाने विविध चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button
Don`t copy text!