लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण-कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण


दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
४३ माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २५५ फलटण-कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर निवडणूक कर्मचार्‍यांचे चार टप्प्यात प्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण दि. ६ एप्रिल २०२४ व ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आले. यावेळी सुमारे १६२३ कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणानंतर मतदान यंत्रांची हाताळणी प्रात्यक्षिक संबंधित कर्मचार्‍यांना देण्यात आले, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

हे प्रशिक्षण सजाई गार्डन मंगल कार्यालयात पार पडले. प्रशिक्षणार्थींना डिजिटल स्क्रीनवर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास माढ्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक केले, असेही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!