बोकड चोरणार्‍या आरोपींच्या लोणंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
घाडगेमळा (ता. फलटण) येथील बोकड चोरणार्‍या दोन आरोपींसह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेेत.

सोन्या उर्फ शुभम आप्पासो घुले (रा. कापडगाव, ता. फलटण), विकी बापूराव खताळ (२२, रा. कापडगाव) व दोन विधीसंघर्ष बालक अशी यातील पोलिसांनी जेरबंद केलेले आरोपी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोकड चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणार्‍या गुन्ह्यांबाबत खबर्‍यांमार्फत माहिती मिळवून यातील आरोपी निष्पन्न केले.

त्यानुसार ६ एप्रिल रोजी यातील एक आरोपी हा कापडगाव (ता. फलटण) परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच लोणंद पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे अधिक विचारपूस करून त्याने व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी तसेच आणि एक साथीदार यांनी मिळवून लोणंद गावच्या हद्दीत घाडगेमळा (ता. खंडाळा) एक बोकड चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरी करताना गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची एफझेड मोटारसायकल अशी एकूण ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह. संतोष नाळे, सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच पो.ह. संजय बनकर यांनी केली. या सर्वांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!