जिल्ह्यातील तीन जण बेपत्ता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान व्यंकटपुरा, सातारा येथील राहत्या घरातून अश्विनी राजेश पवार ही विवाहिता मुलगा कृष्णेश राजेश पवार वय 19 याच्यासह घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे.

दुसऱ्या घटनेत दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते सहा वाजण्याच्या दरम्यान येराड, ता. पाटण येथील राहत्या घरातून सीमा पांडुरंग साळुंखे वय 22 ही युवती कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे.

Back to top button
Don`t copy text!