खासदार रणजितसिंह केंद्रीय मंत्री होवोत ह्याच सदिच्छा : प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 07 डिसेंबर 2021 । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आताच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही परंतु आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात दिसावेत, असे आशीर्वाद सर्व वारकरी बांधवांनी द्यावेत आणि आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री होवोत, अशी सदिच्छा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

फलटण येथील मलठण येथे वारकरी भवनच्या उदघाटन प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, समाधान आवताडे, ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

फलटण येथे वारकरी भवन व वारकरी कार्यालय सुरू करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आगामी काळामध्ये पालखी महामार्गावर फलटण येथे वारकर्यांना या भवनाता नक्कीच फायदा होईल, असेही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!