पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या नियमांत मोठा बदल; PPF सह ‘या’ खात्यांवर होणार थेट परिणाम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमधील व्याजाच्या नोंदणीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेकर-चेकर’ ही नवीन पडताळणी प्रणाली लागू केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०९ ऑक्टोबर : टपाल विभागाने (Post Office) पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह (SCSS) सर्व लहान बचत योजनांमधील व्याज समायोजनाच्या (Interest Adjustment) प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. बचत खात्यांवरील व्याजाच्या नोंदींमध्ये होणाऱ्या त्रुटी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रशासनाने ‘मेकर-चेकर’ प्रणाली लागू केली असून, याअंतर्गत आता प्रत्येक व्याज नोंदीची दोन स्तरांवर कडक तपासणी केली जाणार आहे.

मेकर-चेकर प्रणाली लागू

नवीन नियमानुसार, सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर पहिला अधिकारी (मेकर) व्याजाच्या समायोजनाची नोंद करेल, तर दुसरा अधिकारी (चेकर) त्याची सखोल तपासणी व पडताळणी करेल. पूर्वी ही नोंदणी संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप (Auto-verified) प्रमाणित होत असे. मात्र आता दोन अधिकाऱ्यांमार्फत ही तपासणी होणार असल्याने व्याज समायोजन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होणार आहे.

५ लाखांपर्यंतच्या दुरुस्तीचे नवे निकष

टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रणालीत ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्याज रकमेचे समायोजन स्थानिक स्तरावर या नवीन नियमाने केले जाईल. मात्र, ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्याज समायोजनासाठीचा प्रस्ताव चेन्नई येथील सीपीआरसी (CPRC) केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे. या निर्णयामुळे पोस्ट ऑफिसच्या लाखो खातेदारांच्या ठेवींची सुरक्षा वाढणार असून त्रुटींना आळा बसणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!