
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २८ : निंभोरे, ता.फलटण येथील मॅक पेट्रोलियम येथून 19 लाख रुपयांचा पिवळा व लाल रंगाची केबीन असलेला भगव्या रंगाची टाकी असलेला एल.पी.टी. 3118 कंपनीचा टँकर (क्र.एम.एच.20इ.जी.4153) महेश गोपीनाथ वाघमारे (वय 32, रा.कण्हेर गाव, ता.माढा, जि.सोलापूर) या संशयित आरोपीने मुद्दाम लबाडीने चोरुन नेला असल्याची फिर्याद रामेश्वर महादेव पारीसकर (वय 47, व्यवसाय – मॅनेजर मल्लिकार्जून ट्रान्सपोर्ट, रा.पुणे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.
अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे करीत आहेत.
