बंद घरातून १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमालाची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ३१:  शुक्रवार पेठ या शहरातील जुन्या बाजार पेठेत, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंद घरातून अज्ञाताने दि. २८ मे च्या रात्री सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये रोकड, सोन्याचांदीच्या वस्तूंचा समावेश आहे, ते चोरुन नेल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

श्रीमती स्नेहलता शरदचंद्र गांधी वय ८० वर्षे, रा. शुक्रवार पेठ, फलटण यांनी याबाबत फिर्याद दिली असून गेले काही दिवस फिर्यादी महिला ह्या आपल्या घरात न राहता घर बंद करुन मुलीकडे वास्तव्यास होत्या, त्याचा फायदा घेऊन कोणी तरी जाणकाराने सदर घरफोडी केल्याचा संशय पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी व्यक्त केला आहे.

२ तोळे वजनाच्या ४ बांगडया, एक तोळा वजनाच्या  २ पाटल्या, अर्धा तोळा वजनाची  चेन, अर्धा तोळा वजनाचे कानातील टॉप्स, एक तोळा वजनाची अंगठी असे सोन्याचे दागिणे आणि चांदीची पूजेची भांडी असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ६० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बनकर करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!