दत्तात्रय महादेव नाळे बँकिंग परीक्षेतून बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी अधिकारी पदावर निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, दुधेबावी, दि. ३१ :  चौंडी, दुधेबावी ता. फलटण येथील दत्तात्रय महादेव नाळे यांची अखिल भारतीय पातळीवरील बँकिंग परीक्षेतून बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी अधिकारी पदावर निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. दत्तात्रय नाळे यांचे प्रा. शिक्षण जिल्हा परिषद प्रा. शाळा तिरकवाडी येथे, माध्यमिक शिक्षण जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी येथे, उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय, फलटण येथे झाले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!