
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, फलटण, दि. ३१: शुक्रवार पेठ या शहरातील जुन्या बाजार पेठेत, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंद घरातून अज्ञाताने दि. २८ मे च्या रात्री सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये रोकड, सोन्याचांदीच्या वस्तूंचा समावेश आहे, ते चोरुन नेल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
श्रीमती स्नेहलता शरदचंद्र गांधी वय ८० वर्षे, रा. शुक्रवार पेठ, फलटण यांनी याबाबत फिर्याद दिली असून गेले काही दिवस फिर्यादी महिला ह्या आपल्या घरात न राहता घर बंद करुन मुलीकडे वास्तव्यास होत्या, त्याचा फायदा घेऊन कोणी तरी जाणकाराने सदर घरफोडी केल्याचा संशय पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी व्यक्त केला आहे.
२ तोळे वजनाच्या ४ बांगडया, एक तोळा वजनाच्या २ पाटल्या, अर्धा तोळा वजनाची चेन, अर्धा तोळा वजनाचे कानातील टॉप्स, एक तोळा वजनाची अंगठी असे सोन्याचे दागिणे आणि चांदीची पूजेची भांडी असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ६० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बनकर करीत आहेत.




