युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसाद करून त्यावरून मार्गक्रमक करणे गरजेचे : आमदार दीपक चव्हाण


स्थैर्य, फलटण, दि. १६ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसाद करून त्या विचारावरून मार्गक्रमक करणे गरजेचे आहे, असे मत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

गुणवरे ता. फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार दीपक चव्हाण बोलत होते. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य बापूराव जगताप, दिपक बाबासाहेब आढाव, तानाजी आढाव बाळासाहेब आढाव, सौ. सविता भारत आढाव, सौ. आढाव, कैलास आढाव, राजाभाऊ गावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गुणवरे गावाचा संपूर्ण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. आगामी काळामध्ये गुणवरे गावामध्ये विविध विकासकामे हि प्राध्यानाने केली जातील, अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी या वेळी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे दिपक बाबासाहेब आढाव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तानाजी आढाव, बाळासाहेब आढाव यांच्या हस्ते आमदार दीपक चव्हाण यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान गुणवरे ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता भारत आढाव, अंगणवाडी सेविका सौ. आढाव, कैलास आढाव, राजाभाऊ गावडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!