स्थैर्य, गुणवरे दि.२९: फलटण तालुक्यातील गुणवरे परिसरातील ग्राहकांना उत्तमोत्तम बँकींग सुविधा उपलब्ध करुन देण्यात यशस्वी ठरल्यामुळे शाखेचे आज स्व:मालकीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होत आहे. शाखेच्या माध्यमातून परिसरातील ग्राहक, शेतकरी, पगारदार व व्यावसायिक यांच्या गरजा विचारात घेवून बँकेने आखलेल्या विविध योजना उत्तम पद्धतीने राबविणार्या गुणवरे शाखेचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारा चे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी काढले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुणवरे शाखेचा स्व:मालकीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर समारंभ सुनिल माने यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाखेचे मॅनेजर ए.डी.घोरपडे, कॅशिअर एस.एम.महात, विकास अधिकारी डी.एस.बरकडे, लेखनीक डी.पी.सस्ते, सौ.ए.एस.कापसे, सेवक व्ही.पी.हगारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.