स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ शक्ती देणारे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कराड – यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व उपस्थित मान्यवर.
स्थैर्य, 12 मार्च, सातारा : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजित पवार यांनी सांगितले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी, नागरिक तसेच शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ’शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली’ या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली’ या कार्यक्रमाद्वारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!