
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ७ : सध्या फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या मुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत निवडणूक करिता लागणाऱ्या परवानगी साठी एक खिडकी योजना तहसील कार्यालय येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.
