वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार


स्थैर्य, लोणंद, दि. ०३: लोणंद नगरपंचायतीच्या हद्दीतील लोणंद सातारा रोडवरील ‘साईबा अमृततुल्य’च्या पाठीमागे असलेल्या घरात अनेक वर्षे थकबाकी असलेल्या घरात गेले असता धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील साईबा अमृततुल्यच्या पाठीमागे रहायला असलेल्या बाबुलाल खोडीदास शहा यांच्या घरी मागील सहा वर्षे थकीत असलेली पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यास सांगण्यासाठी गेलेल्या नगरपंचायतीचे कर्मचार्‍यांना आज दिनांक 2 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी बाबुलाल खोडीदास शहा व अभय बाबुलाल शहा दोन्ही रा. लोणंद ता. खंडाळा यांनी शिवीगाळ करुन अंगावर येवून कर्मचारी विजय रघुनाथ बनकर, रामदास बाजीराव तुपे व फिर्यादी शंकर शेळके यांना धक्काबुक्की केली त्यावेळी वसुली पथकमध्ये हनमत माने, पांडुरंग शेळके, राजेंद्र शेळके, निशा फडतरे, शाहीन सय्यद या सर्वांना शहा यांनी त्याच्या राहत्या घराचे कंपाऊडच्या लोखंडी गेटला कुलूप लावून अडकवून ठेवून शिवीगाळ करून दमदाटी करुन बाहेर जाण्यास अटकाव केला व ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून लोणंद पोलिस ठाण्याचे पोउपनि गणेश माने तपास करत आहेत.

लोणंद नगरपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, वसूली कामात कोणीही अडथळा आणू नये व सहकार्य करावे. अन्यथा, पाणी कनेक्शन कट करण्यात येईल.
– लोणंद नगरपंचायत मुख्य अधिकारी हेमंत ढोकले


Back to top button
Don`t copy text!