
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ०३ : कृष्णानगर, सातारा येथे पायी चालत जाणार्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. याबाबत माहिती अशी, इंदुबाई आप्पा काळे या कृष्णानगर येथील त्यांच्या घरापासून जवळच पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून दोन अज्ञात त्याठिकाणी आले. त्यांच्यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने इंदुबाईं यांच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे 30 हजारांचे मणीमंगळसुत्र हिसकावले. यानंतर दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून तपास सपोनि मछले करत आहेत.
