कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढदिवस साजरा करणार नाही; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची WhatsApp स्टेटसद्वारे माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ०७ : सध्या महाराष्ट्रात कोरोना अर्थात कोव्हिड १९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. ८ एप्रिल रोजी तारखेप्रमाणे व १३ एप्रिल रोजी तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हीच माझी ताकद आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटसद्वारे दिलेली आहे.

कोव्हिड-19 विरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, खरी लढाई सुरू होते पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची. म्हणूनच शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुक्त झालो म्हणजे गाफिल राहून चालणार नाही. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे, असेही आवाहन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे केलेले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!