स्मार्ट शॉपिंगसाठी उर्मिला निंबाळकर यांचा नवा फॉर्म्युला; सणासुदीच्या खरेदीत पैशांची बचत कशी करावी?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

खरेदीत पैशांची बचत आणि स्टायलिंगचे नियोजन कसे करावे, यावर इमेज कन्सल्टंट उर्मिला निंबाळकर यांनी काही सोप्या टिप्स आणि महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

स्थैर्य, पुणे, दि. २९ ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात खरेदी करताना पैशांची बचत आणि स्टायलिंगचे अचूक नियोजन करण्यासाठी युवा इमेज कन्सल्टंट उर्मिला निंबाळकर यांनी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. कपड्यांची निवड, बजेट आणि खरेदीची योग्य पद्धत यावर त्यांनी एका विशेष पॉडकास्टमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले.

खरेदीचे महत्त्वाचे नियम

जेव्हा घरात एक नवीन वस्तू येते, तेव्हा कपाटातील दोन जुन्या वस्तू बाहेर गेल्या पाहिजेत, हा खरेदीचा मुख्य नियम असल्याचे उर्मिला निंबाळकर यांनी सांगितले. नवीन कपडे घेताना ते किमान तीन जुन्या कपड्यांसोबत मॅच होतील, याची खात्री करावी. केवळ सेल लागला आहे किंवा सोशल मीडियावर ट्रेंड आहे म्हणून अनावश्यक खरेदी करणे टाळावे.

लाईफस्टाईलनुरूप बजेटचे नियोजन

आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील कृतींनुसार कपड्यांचे बजेट ठरवावे. ऑफिसला जाणाऱ्यांनी त्यांच्या फॉर्मल आणि रोजच्या कपड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वर्षभरातून एकदाच येणाऱ्या सणांसाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी, रोजच्या आयुष्यात कम्फर्ट देणाऱ्या इनरवेअरवर आणि कपड्यांवर गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीतील फरक

शूज, फाउंडेशन आणि कंसीलर यांसारख्या गोष्टी कधीही ऑनलाईन खरेदी करू नयेत. शूज प्रत्यक्ष घालून, चालून आणि उडी मारून तपासावेत. ऑनलाईन खरेदी करताना कपड्यांचे फॅब्रिक आणि त्याचे विवरण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. उत्तम दर्जाचे कापड कपड्यांची श्रीमंती ठरवते, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!