स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Team Sthairya by Team Sthairya
December 28, 2020
in महाराष्ट्र
देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
ADVERTISEMENT


स्थैर्य, मुंबई, दि. २८ : अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून हे लोकही येत असतात. यासाठी त्यांचे वाईट विचार संपवणे महत्त्वाचे आहे. समाजाला एक चांगला विचार देणे गरजेचे असून, प्रत्येक भारतीयांना देशाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे ही जाणीव झाली पाहिजे, असे विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

(जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौंन्सील) जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने अवैधरित्या पैशाचा व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक वेबिनारचे आयोजन केले आहे. ही परिषद जोखीम अनुपालन व्यावसायिक संघटना (आरसीपीए) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर भारतीय संशोधन परिषद (आयसीआरआयईआर) आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (आयएसआयएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. हा वेबिनार दोन दिवसीय असून, या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

या वेबिनारमध्ये सेवानिवृत्त आयपीएस आणि ॲन्टी मनी लाँडरिंग आणि फायनान्स टेरेरिझम २०२० चे अध्यक्ष  कर्नल सिंग, सेवानिवृत्त आयएफएस आणि ग्लोबल काऊंटर कौन्सीलचे सल्लागार बोर्डचे अध्यक्ष डॉ.कनवाल सिबल, निवृत्त आएएस आणि ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सीलचे डॉ. शेखर दत्त, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल आणि खासदार विवेक तानखा आदीं तज्ज्ञांनी यावेळी या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सील (जीसीटीसी)चा इतिहास, कार्य, उद्दीष्टे आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत माहिती दिली.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्या संघटना किंवा संस्था दहशतवाद वाढविण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात यामध्ये उच्च विद्याविभुषीत लोक कार्यरत असल्याचे दिसून येते, यामुळे त्यांचे विचार कसे बदलवावे आणि समाजाला एका वेगळ्या विचारापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण उच्च शिक्षीतांमध्येही जाती-धर्म-पंथ-विचार यावरून गैरसमजुती पसरवल्या तर त्यांचे रूपांतर राक्षसी प्रवृत्तीमध्ये होऊ शकते असे दिसते. यामुळे चांगले विचार समाजाला देऊन त्याचा प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल पुढे म्हणाले, काश्मीर पासून मुंबई ते अमेरिकापर्यंत सगळ्यांनाच या दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. या दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ही जागतिक समस्या झाली आहे. या आर्थिक दहशतवादावर निर्बंध लादण्यासाठी जागतिकस्तरावरही नियम आखण्यात आले आहेत. आपली ही जीसीटीसी संघटना जागतिकस्तरावर कार्य करणारी संघटना आहे. आपण आपल्या दोन दिवसीय परिषदेत केवळ एक किंवा दोन देशांतील दहशतवादाचा विचार न करता जागतिकस्तरावरचा विचार केला तर उपाययोजनांपर्यंत आपण पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. भारतातील अनेक तज्ज्ञ या संघटनेत आहेत, हे तज्ज्ञ शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही या दहशतवाद या विषयावर अतिशय गंभीरपणे चर्चा करून उपाय आखण्याचे प्रयत्न करीत असल्याने जीसीटीएसचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या.

वेबिनारच्या पहिल्या दिवशी पैशांचा गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद याबाबत भारतातील अधिकृत आणि नियामक चौकटीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बेनी चटर्जी, भारतीय रिझर्व्ह बँकचे जनरल मॅनेजर विवेक श्रीवास्तव, नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीचे वरिष्ठ वकिल सुरेंद्र सिंह, अंमलबजावणी संचालनालयाचे माजी उपकायदेशीर सल्लागार ए.सी.सिंग यांनी यावेळी आपली मते मांडली. वीआयटी लॉ युनिव्हसीटीचे डीन डॉ.चक्का बॅनर्जी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

समृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्या – पालकमंत्री सुनील केदार

Next Post

श्रीमती सखुबाई श्रीधर अरलुलकर (मावशी) यांचे निधन

Next Post

श्रीमती सखुबाई श्रीधर अरलुलकर (मावशी) यांचे निधन

ताज्या बातम्या

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा व्हिडीओ बघाच !

अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा व्हिडीओ बघाच !

January 21, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

हिंगणी व बिदाल मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्टही  निगेटिव्ह

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.