कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हि सुरक्षित असून पात्र सर्वांनी लस घ्यावी : श्रीमंत संजीवराजे


स्थैर्य, फलटण, दि. १३ : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे व मिलिंद नेवसे यांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हि सुरक्षित असून पात्र सर्व नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सर्वानी कोरोनाची लस घेतली. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, डॉ. धुमाळ यांच्या उपस्थितीत कोव्हीशील्ड हि लस सर्व मान्यवरांना देण्यात आलेली आहे. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य (डॉ. गुंगा), स्थैर्य लाईव्हचे संपादक चैतन्य रुद्रभटे, जगन्नाथ कापसे (भाऊ), सुरेश काकडे, योगायोग फोटोजचे नामदेव नाळे (अप्पा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

60 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंध लस घ्यावी, असे आवाहन हि या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी केले.


Back to top button
Don`t copy text!