
दैनिक स्थैर्य । दि. 21 जुन 2025 । फलटण । फलटण शहरामधील पृथ्वी चौक अर्थात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक या रस्त्याच्या पॅच वर्कचे काम पालखीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आले असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी मोरे म्हणाले की, फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अर्थात पृथ्वी चौक ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक या रस्त्याची चाळण झालेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येणाऱ्या काही दिवसांमध्ये फलटण शहरात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून सदरील रस्त्याच्या पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आहे.