
दैनिक स्थैर्य । दि. 21 जुन 2025 । फलटण । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो. सदरील योग दिना दिवशी फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे.
यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, डॉ. प्रवीण आगवणे, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, भाजपा नेते जयकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित राहून योग साधना केली व नागरिकांनी सुद्धा नियमित योगा करण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी यावेळी केले आहे.