फरांदवाडीत टूव्हीलरच्या धडकेत एक गंभीर जखमी


दैनिक स्थैर्य | दि. 21 जून 2025 | फलटण | फलटण ते सातारा रस्त्यावर फरांदवाडी गावच्या हद्दीमध्ये उळुंब फाट्यावर एका अनोळखी इसमाने मोटरसायकलीवरून भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने एकास गंभीर जखमी केले असल्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये ओमसाई संपत सावंत यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याकडून मिळालेली माहिती कशी की, दि. 16 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फलटण ते सातारा रस्त्यावर फरांदवाडी गावच्या हद्दीमध्ये उळुंब फाटा येथे फलटण कडे चालत जात असताना एका अनोळखी मोटरसायकल स्वाराने भरधाव वेगामध्ये येत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पाठीमागून फिर्यादीस जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले आहे व फिर्यादीस औषध उपचार न करता मोटरसायकलस्वार फरार झाला आहे.

याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार राणी फाळके करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!