वाचन संस्कृती जपणे काळाची गरज – प्रा. माधुरी दाणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | फलटण |
आजच्या मोबाईल युगात आपण सर्वजण ‘वाचन संस्कृती’ विसरलो आहोत. वाचन संस्कृती पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे. सर्वांनीच जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे. पुस्तकांनाच आपले मित्र बनवले पाहिजे. सर्व मातांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे व भावी पिढीला पण वाचनाचे संस्कार केले पाहिजेत. संगिनी फोरमचा हा सुंदर उपक्रम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ फलटणच्या अध्यक्षां प्रा. माधुरी दाणी यांनी केले.

संगिनी फोरम फलटण आयोजित ‘वाचन काळाची गरज’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून दाणी बोलत होत्या. याबरोबरच ज्योतिष तज्ज्ञ गौरी आरेकर यांनी १२ राशीबद्दल सखोल मार्गदर्शन केले, त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले व मानवाने योगसाधना करणे काळाची गरज आहे, असे सांगितले.

जनसेवा वाचनालयाच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाकरिता संगिनी फोरम अध्यक्षां अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनीषा घडिया, मॅग फायनान्स व जनसेवा परिवाराच्या सुनिता मोहटकर, संगिनी सदस्या सारिका दोशी, संध्या महाजन, अलका पाटील, जयश्री उपाध्ये, संगीता जैन, नीलम डुडु, सुवर्णा रणदिवे, नेहा दोशी, दीपिका होरा तसेच बहुसंख्य महिला सदस्या उपस्थित होत्या.

संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन यांनी संगिनी फोरमच्या कार्याची सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संगिनीच्या सहसचिव व माऊली फाउंडेशनच्या सदस्या नीता दोशी यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!