लक्ष्मीनगर येथे घरफोडी; ५३ हजारांचा मुद्देमाल चोरट्याकडून लंपास


दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील लक्ष्मीनगर येथील अर्जुन कृष्णाजी घाडगे यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व रोख ३५०० रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या चोरीची अधिक माहिती अशी, दि. १ जुलै २०२४ रोजी रात्री २.०० ते सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने फिर्यादी घाडगे यांच्या घराच्या डायनिंग रुमच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर डायनिंग रुममध्ये लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मनीमंगळसूत्र किंमत ५० हजार रुपये व डायनिंग रुममध्ये खुर्चीवर ठेवलेली पर्समधील साडेतीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५३,५००/- रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.

या चोरीचा अधिक तपास म.पो. हवा. पूनम बोडके करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!