लायन्स क्लब गोल्डन ग्रुप फलटणच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान


दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | फलटण |
लायन्स क्लब गोल्डन ग्रुप फलटणच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉ. श्री. विकास कुंभार (नेत्रतज्ज्ञ) आणि डॉ. सौ. सुषमा कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. कुंभार हे दाम्पत्य गेली २२ वर्ष फलटण शहरामध्ये अविरतपणे रुग्णांची सेवा करीत आहे. त्यांचे सुसज्ज असे ‘दृष्टी हॉस्पिटल’ फलटण येथे सुरू आहे. हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचं पवित्र काम त्यांच्या हातून होत आहे. त्यांच्या या प्रवासातील काही माहिती आणि काही किस्से त्यांनी सांगितले की, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत खूप अवघड ऑपरेशन्स त्यांनी केली आहेत. कितीतरी रुग्णांची दृष्टी गेली होती, त्यांना परत चांगली दृष्टी देण्याचं खूप मोठं कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी बर्‍याच गावांमध्ये मोफत नेत्रशिबिरे घेतली आहेत.

तसेच डॉ. श्री. सौरभ खराडे आणि डॉ. सौ. सई खराडे यांचे सुसज्ज असे ‘साई हॉस्पिटल’ आहे, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असे कार्य केले आहे. खूप रुग्णांचे प्राण वाचवण्याचे खूप मोठं पवित्र काम त्यांचे हातून झाले आहे. आज ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने या लायन्स क्लब गोल्डन ग्रुप, फलटणच्या वतीने त्यांचा सन्मान करणेत आला. तसेच चार्टर्ड अकौंटंट श्री. सुजय चव्हाण यांचेही काम गेली २० वर्ष अतिशय उल्लेखनीय असे सुरू आहे. त्यांचा यावेळी ‘सीए डे’च्या निमित्ताने सन्मान करणेत आला.

यावेळी लायन्स क्लब फलटण गोल्डन ग्रुपच्या सौ. स्वाती चोरमले, अध्यक्षा सौ. निलम देशमुख, संस्थापक अध्यक्षा सौ. उज्ज्वला निंबाळकर, संचालिका सौ. सुनीता कदम, मा. अध्यक्षा सुनंदा भोसले ह्या उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!