महापुरुषांचे आचार विचार अंगीकृत करून सामाजिक कार्य करावे काळाची गरज – डॉ.प्रशांत नारनवरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । पुणे । लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा समाजकल्याण विभातर्फे सामाजिक न्यायदिनी सकाळी 9 वाजता भारतीय संविधान जागर भव्यदिव्य रॅली राजीव गांधी लर्निंग कॉलेज ते शाहु कॉलेज अशी काडून त्याची सांगता छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास समाजकल्याण आयुक्त भा. प्र.से.डॉ.प्रशांत नारनवरे,प्रादेशिक उपायुक्त मा. बाळासाहेब सोळंखी, सहआयुक्त श्रीमती संगीता डावखर,पुणे शहर तहसीलदार श्रीमती राधिका बारटक्के, हवेली तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलतेपाटील यांचे शुभहस्ते भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा. प्रवीण कोरगंटीवार,विशेष अधिकारी (शा. नि. शाळा) मा. मल्लिकानाथ हरसुरे, समाजकल्याण निरीक्षक गोपीचंद आल्हाट, वैभव लव्हे, शाहु कॉलेज च्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड, समाजकार्य कर्वे महाविद्यालयाचे डॉ.महेश ठाकूर, डॉ.शर्मिला रामटेके, समाजसेवक सत्यशोधक रघुनाथ ढोक, प्रा.वैशाली भीमटे, प्रा.नवनाथ सरोदे उपस्थित होते.

याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे म्हणाले की सर्व महापुरुषांचे आचार विचार अंगीकृत करून स्त्री पुरुष समानता,मानवता धर्म पाळण्याची नितांत गरज नव्हे तर काळाची गरज असल्याचे म्हंटले. यासाठी सर्व शाळा महाविद्यालयाने महापुरुषांचे जयंती, स्मृतिदिनानिमित्ताने प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना चांगले विचार देण्याची गरज असून सोबत सामाजिक कार्याची प्रत्यक्षात धडे दिले तरच तरुण पिढी जबाबदार नागरीक बनतील असे देखील म्हंटले.

यावेळी संगीता डावखर म्हणाल्या की लोकराजा शाहु महाराज यांनी त्याकाळात विविध जाती धर्माची मोफत वस्तीगृह काडून गरिबांना तसेच मागासवर्गीय यांना शिक्षण उपलब्ध केले तसेच हुशार मुलाना परदेशी शिक्षण घेण्यासाठी आथिर्क मदत केली त्यातील एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून त्यांनी भारताला संविधान दिले त्याचा आपण सर्वांनी सन्मान करणे जरूरीचे आहे. शाहु महाराज यांनी जातिभेदाचे पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करीत सत्यशोधक विवाह,विधवा पुनर्विवाह असे विविध महान कार्य केले म्हणूनच आज आपण सामाजिक न्याय साजरा करीत आहोत.पुढे डावखर म्हणाल्या की आपण सर्वांनी महापुरुषांचे विचार वारसा आत्मसात करावा म्हणजे ही आदरांजली होईल.

तहसीलदार बारटक्के व कोलते पाटील यांनी म्हंटले की आज देखील समाज अंधश्रद्धा कर्मकांड यात गुरपटलेला असून त्यातून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. आपल्याला या कोव्हिडं ने अनेक गोष्टी शिकविले असून संविधानामुळेच आपण लढा देत आहोत असे ही म्हंटले.

याप्रसंगी मोठया संख्येने समाजकल्याण आश्रम शाळा, कॉलेज निवासी वसतिगृह, समाजकार्य कर्वे महाविद्यालय,अनंतराव पवार व पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग कॉलेज च्या मुलांनी सहभाग घेत सर्व परिसर महापुरुषांचे जयघोषानी घुमगुमला होता तर समाजसेवाच्या विद्यार्थ्यांनी संविधान जागर व इतर गोष्टींवर जागोजागी पथनाट्य सादर करीत प्रबोधन पर गाणी म्हणत प्रेरणादायी वातावरण निर्माण केले सोबत विद्यार्थ्यांनचे हातात संविधानाचे हक्क कर्तव्य,सन्मान असे विविध पलकांनी जागृती केल्याने सर्व मुलांचे अधिकारी वर्गानी कौतुक केले तसेच महाविद्यालयाचे देखील आभार मानले.

ही सविधान सन्मान रॅली साठी मोलाचे सहकार्य समाजकल्याण चे सर्व स्टाफ, गृहपाल, डॉ.महेश ठाकूर,समाजकल्याण निरीक्षक महेश गवारे, सत्यशोधक रघुनाथ ढोक ,नितीन रणदिवे,गणेश कोंढाळकर, हुलावळे, मंगेश गाडीवान यांनी केले तर आभार समाजकल्याण निरीक्षक श्रीमती नेत्राली येवले यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!