दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
दिल्ली येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते हैदराबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन)चे रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुकुल माथुर यांची भेट घेतली. यावेळी मुंबई ते हैदराबाद जी बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे; त्यामध्ये फलटण तालुक्याचा समावेश आहे. फलटण तालुक्यामधून बुलेट ट्रेन जाताना फलटण तालुक्यासाठी बुलेट ट्रेनचा थांबा करावा; अशी मागणी यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे
मुंबई ते हैदराबाद धावणारी बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदार संघातून जावी, याकरीता केलेल्या प्रयत्नांना यश आले. आता या ट्रेनकरीता मुंबई नंतर पुणे, अकलूज, पंढरपूर या स्टॉपचा समावेश करण्यात आला आहे व यामध्ये फलटण तालुक्याच्या स्टॉपचा समावेश करण्यात यावा, यासाठी यावेळी मागणी केली, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.