
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.९: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, माची पेठ येथे संबंधित कुटुंबिय राहत आहे. त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीस अज्ञाताने पळवून नेले. याबाबत फिर्याद शहर पोलिसांत दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून तपास शिर्के करत आहेत.
