दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२३ । सातारा । भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिना निमित्त गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वा. छत्रपती शाहू स्टेडियम येथे राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रध्वजारोहण समारंभ व संचलनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना उपस्थित रहाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा यांचेमार्फत जादा स्थानिक बसेस सोडण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमात भाग घेता याावा यासाठी त्या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 ही वेळ सोडून शासकीय, अशासकीय, कार्यालयाने अथवा संसथांनी आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावा असे शासनाचे आदेश आहेत.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.