क-हाडकरांनी कसली कंबर, काेल्हापूरकर जाेमात, पुण्यात सर्वाधिक कमी मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून दुपारी 12 पर्यंत पदवीधरसाठी पाच जिल्ह्यातून एकुण 19.44 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 26.25 टक्के मतदान झाले. सर्वच बुथवर महाविकास आघाडी तसेच भाजपचे नेते व कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले आहेत. 

पदवधीरसाठी पुणे जिल्ह्यात 10.80, सातारा 20.23 , सांगली 22.51 , सोलापूर 20.72 कोल्हापूर 28.36 टक्के मतदान झाले आहे. पाच जिल्ह्यातून एकुण 82 हजार 877 जणांनी दुपारी 12 पर्यंत मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 62 हजार 95 पुरुष तसेच 20 हजार 782 महिला पदवीधर मतदारांचा समावेश आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यातून 26.25 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून 13.10, सातारा 31.34 , सांगली 34.20, सोलापूर 35.36, कोल्हापूर 43.12 टक्के मतदान झाले आहे. पाच जिल्ह्यातून एकुण 19 हजार 045 जणांनी दुपारी 12 पर्यंत शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 14 हजार 544 पुरुष तसेच 4501 महिला मतदारांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात मतदानात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. तर सर्वात कमी मतदान पुणे जिल्ह्यातून झाले आहे. पुण्यात पदवीधरसाठी 10.80 टक्के, शिक्षकसाठी 13.10 टक्केच मतदान झाले आहे.

कऱ्हाड येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी कऱ्हाड तालुक्‍यातील “पदवीधर’साठीच्या 40 शिक्षक निवडणुकीसाठी आठ असे एकूण 48 मतदान केंद्रांवरील मतदान अधिकारी व कर्मचारी, शिपाई, मायक्रो ऑब्झरव्हर अशी 450 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानास आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला. कराडमध्ये चार ठिकाणी 17 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे नाव शोधण्यासाठी लॅपटॉप पूरविले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक डॉ रणजित पाटील व कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!