दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर संघटनेच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे सर्व सफाई कामगार उद्या काम बंद आंदोलन करणार होते; परंतु नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबईचे उपायुक्त यांनी मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र संघटनेने फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे.
याबाबत संघटनेने म्हटले आहे की, नगर परिषदेचे सर्व सफाई कामगार व वाल्मिकी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. ९ ऑगस्अ रोजी ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येणार होते; परंतु नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या उपायुक्तांनी आमच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली असून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही उद्याचे आंदोलन मागे घेत आहोत.