मुलीच्या वडिलांच्या डोक्यात हॉकी स्टिकने मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: मुलीच्यासमोर गाडी उभी का केली, याचा जाब विचारल्याने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना अलंकार कॉलनी येथे दि. २८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहन कुंभार (रा. महालक्ष्मी मंदिरा शेजारी करंजे पेठ सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत चैत्राली देवेंद्र राजेमहाडिक (वय १९, रा दौलत नगर सातारा) या युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, चैत्राली राजे महाडिक व तिची मैत्रीण काजल या घरी जात असताना संशयित रोहन कुंभार याने त्याची दुचाकी जवळ थांबवली. त्यावेळी माझे वडिल देवेंद्र राजे महाडिक तेथे आले. त्यांनी तू गाडी माझ्या मुलीसमोर का थांबवली असे विचारले असता रोहन याने वडिलांच्या डोक्यात हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यावेळी चैत्रालीने रोहनला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिलाही कमरेच्या डाव्याबाजूला हॉकी स्टिकने मारले. तसेच चैत्राली च्या आईलाही त्याने दमदाटी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!