सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, बारामती : वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना फलटण तालुक्यातील वडले येथे रविवारी (दि . २९ ) रोजी सायंकाळी घडली असल्याचे समोर येत आहे. छऱ्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. 

सपोनी लांडे हे सहकाऱ्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले असताना ही घटना घडली असल्याचे कळत आहे. फलटण तालुक्यातील वडले येथे हा प्रकार घडला असल्याचे समजत असुन हे गाव फलटण – शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून नऊ किमी अंतरावर आहे. 

२६ ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सराफ व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांच्याकडील ११ लाख ६६ हजारांचे दागिने अज्ञातानी जबरीने चोरुन नेले होते. याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा . मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने फिर्याद दिली होती. २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणाऱ्या कुलथे यांना उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास करण्यात येत आहे. 

दरम्यान सपोनि लांडे हे सहकाऱ्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या प्रकरणातील संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. लांडे यांनी यापूर्वी फलटणमध्ये काम केले आहे. त्यामुळे या भागाची चांगली माहिती त्यांना आहे. वडले येथे गेल्यावर गावठी पिस्तुलातून त्यांच्यावर संशयिताने गोळीबार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, या घटनेत कोणीही गंभीर झालेले नाही. छर्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाला असल्याची माहिती मिळत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!