उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०६ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील नाना जोतिराम दडस हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून ठाणे जिल्ह्यातील श्रीमती भाग्यश्री भाऊसाहेब सांगळे ह्या प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाचे परिक्षोत्तर ( अ.प.) उप सचिव यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!