
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२३ | फलटण |
उद्या, गुरुवार, दि. २९ जून रोजी ‘आषाढी एकादशी’ व ‘बकरी ईद’ हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे धर्मीय भावनांचा आदर म्हणून फलटण शहरातील सर्व मज्जीदचे जिम्मेदार व मुस्लीम बांधवांकडून उद्या ईदनिमित्त ‘कुर्बानी’ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दिवशी ईदची नमाज होईल, असे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात फलटण शहर पोलीस स्टेशन मोहल्ला कमिटीची बैठक होऊन या बैठकीत उद्या ‘बकरी ईद’ दिवशी ईदची नमाज होईल; परंतु या दिवशी कोणतीही ‘कुर्बानी’ करणार नाही, असा एकमुखी निर्णय सर्व मज्जीदचे जिम्मेदार व मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला.
तसेच आषाढी एकादशीनिमित्त सर्व हिंदू बांधवांना व महाराष्ट्रातील सर्व रहिवाशी यांना मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
