सस्तेवाडी येथील श्रीमंत सगुणामाता विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन व वार्षिक वितरण समारंभ १४ फेब्रुवारीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सतीश फरांदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिताराणी कुचेकर यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बुधवारी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सांस्कृतिक हॉल, मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या समारंभास प्रशालेच्या चेअरमन सौ. वसुंधराराजे नाईक निंबाळकर व व्हा. चेअरमन सौ. नूतन शिंदे उपस्थित राहणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!