
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । फलटण । आज सोनगाव येथे दि.०७/०९/२०२२ रोजी भारताला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखविणारे आद्य क्रांतीकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरी करण्यात आली.
या वेळेस प्रा. राजेंद्र गायकवाड सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या मध्ये त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला व तरुणांनी व्यसनापासून दूर होत शिक्षणाची कास धरावी असा संदेश दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दूध संघ फलटण माजी चेअरमन व फलटणचे माजी नगरसेवक,मा श्री भीमदेव बुरुंगले हे लाभले , गावच्या प्रथम नागरिक सौ ज्योत्स्नाताई जगताप यांनी फोटो पूजन करून मान वंदना दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेश निकाळजे यांनी केले तर आभार माजी सरपंच पोपटराव बुरुंगले यांनी मानले.
या वेळेस ,कोंडीबा लांडगे, राजेंद्र लांडगे, पवन भोसले, संदीप बेलदार , संदीप पिंगळे मा. तंटामुक्ती अध्यक्ष सोनगाव, रमेश जगताप, दिलीप भंडारे , महादेव कांबळे , विठ्ठल जगताप, शिवाजी ढवळे , राजेंद्र टेंबरे, हनुमंत थोरात, संतोष गोरवे, गुलाबराव डोंबाळे, संतोष आडके, सुरेश पवार, रमेश मदने, राहुल गायकवाड, धर्मराज लांडगे , सचिन लांडगे , विशाल लांडगे, अमोल सस्ते ,गणेश कांबळे , महादेव चव्हाण,हनुमंत निकाळजे, दत्तात्रय ननावरे, डॉ. निलेश निकाळजे,जगन्नाथ जगदाळे, नानासो धायगुडे, डॉ योगेश बुरुंगले, अरविंद लवटे, सचिन शेवते,दादासो बंडगर, महेश जगताप, निखिल कांबळे, चेतन लांडगे, नारायण तुपे, नामदेव शिंदे, सचिन कांबळे, प्रणव लोंढे, बाळासो जगताप, राहुल यादव, बाळासो यादव, दगडू चव्हाण, बाबसो जाधव, बाळासो गायकवाड,सुरेश गेजगे, हेमंत चव्हाण व इतर सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सर्व तरुण मंडळ सोनगाव यांचेकडून सर्वसमावेशक जयंती साजरी केली गेली.
