उपळवेजवळ साप आडवा आल्याने दुचाकी पुलावरून ओढ्यात कोसळली; अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण | उपळवे, तालुका फलटण गावच्या हद्दीत उपळवे ते हिराबाई डोंगर घाटमाथा रोडवर स्वराज कारखान्याच्या पाठीमागील बाजूस ओढ्याच्या पुलावर दि. ९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यात साप आडवा आल्याने मोटारसायकलवरील ताबा सुटून मोटारसायकल ओढ्यात पडल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

या अपघाताची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उपळवे, तालुका फलटण गावच्या हद्दीत उपळवे ते हिराबाई डोंगर घाटमाथा रोडवर स्वराज कारखान्याच्या पाठीमागील बाजूस ओढ्याच्या पुलावर दि. ९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रामचंद्र जयसिंग ढेंबरे (वय ६०, रा. बोडकेवाडी, ता. फलटण जि.सातारा) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एमएच ११ एडब्लु ९९०७) ही सीतामाई घाटमाथा बाजूकडून उपळवे बाजूकडे चालवित घेवून जात असताना रोडवर साप दिसल्याने मोटारसायकलवरील त्यांचा ताबा सुटून मोटारसायकलसह ओढ्याच्या कठड्यास धडकून ओढ्याच्या खोल पात्रात पडले. या अपघातात त्यांना व पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा स्वप्नील रामचंद्र ढेंबरे (वय २६, रा. बोडकेवाडी, ता. फलटण, जि.सातारा) या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर पो.ह. साधना कदम यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!