दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
सरडे, ता. फलटण, जि.सातारा येथील एका महिलेने आपल्या राहत्या घरी दि.३१ मार्च २०२३ रोजी सायं. ४.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रवाचे प्राशन केले होते. त्यानंतर या महिलेवर पुणे येथे उपचार सुरू होता. मात्र, या महिलेचा २ एप्रिल २०२३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन १३ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उज्ज्वला कैलास शिंगाडे (वय ३७, रा. सरडे, ता. फलटण, जि.सातारा) या महिलेने दि. ३१/०३/२०२३ रोजी सायं. ४.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विषारी द्रव पिले होते. तिला त्रास होऊ लागल्याने देवकाते हॉस्पीटल बारामती येथे अॅडमीट केल्यावर त्यानंतर तिला दि. ०२/०४/२०२३ रोजी रात्री १.३० वा. सुमारास विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, पुणे येथे उपचारकामी अॅडमीट केले. उपचारादरम्यान दि.०२/०४/२०२३ रोजी पहाटे ०२.२२ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.