शिवाजीनगर येथील मतिमंद मुलांच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा शिवाजीनगर, फलटण या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. १ एप्रिल २०२४ रोजी नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आला होता. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसाद जोशी, डॉ. हेमलता गुळवणी व श्री. धर्मेंद्र भल्ला होते. त्यांचा सत्कार अध्यक्ष श्री. संदीप चोरमले व सचिव स्वाती चोरमले यांनी केला.

यावेळी डॉ. जोशी म्हणाले की, अशा मुलांना सांभाळणे, शिकवणे हे खूप अवघड काम आहे. हे पवित्र कार्य आपण व आपले शिक्षक करत आहात, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या शाळेला मी सहकार्यही करणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ला. सौ. उज्ज्वला निंबाळकर, ला. सौ. सुनीता कदम, ला. सौ. निलम देशमुख, अध्यक्ष, लायन्स क्लब गोल्डन तसेच सौ. रूची भल्ला, श्री. दिलीपशेठ अग्रवाल, श्री. महेश जगताप, श्री. सुभाष मुळीक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी विद्यार्थी खूपच उत्साही होते. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री. संदीप चोरमले यांचे मार्गदर्शन केले. त्यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी केलेल्या वर्षभरातील कामाचे कौतुक करून सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक श्री. अमितकुमार राऊत यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक श्री. रमेश लालसरे, सौ. सुनीता गायकवाड, सौ. गिरणा पवार, श्रीमती राधिका माळवे, श्री. अमोल राऊत, सौ. वंदना धाराशिवकर व सौ. प्राची जवस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्याध्यापक श्री. अमितकुमार राऊत यांनी आभार मानले. विविध गुणदर्शन कार्यकम व शाळेला नियमित सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आणि नाटक, मुलांचा सुंदर अभिनय पाहून उपस्थित सर्व पालक आणि पाहुणे भारावून गेले होते. स्नेहभोजनचा आस्वाद सर्वांनी घेऊन सर्व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहाने पार पडला.


Back to top button
Don`t copy text!