श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृपितृ पूजन व विद्यार्थिनींना साहित्य वाटप उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृपितृ पूजन व गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

आई-वडिलांचा आदर ठेवा, घरातून बाहेर पडताना आई-वडिलांना नमस्कार करा, तो आशिर्वाद कधीच वाया जाणार नाही, असा संदेश शाळा समितीचे चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमास कीर्तनकार हभप श्री. रामदास जगताप (गुरूजी), वाठार निंबाळकर यांनी विद्यार्थी, पालक यांना त्यांच्या ओघळत्या वाणीतून बहुमोल मार्गदर्शन केले. शाळेने घेतलेल्या उपक्रमाबाबत कौतुक करून आत्तापर्यंत केलेल्या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम पाहिला आहे. या कार्यक्रमाचे मूल्य फार मोठे आहे. मूल्य हे मनातल्या संस्कारांवर ठरत असते. तो संस्कार मुलांना पुढे घेऊन जात असतो. शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी नम्र राहावे. एक आठवण विद्यार्थ्यांचे जीवन उजळू शकते. शाळेने घेतलेला मातृपितृ पूजन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनभर स्मरणात राहील.

कार्यक्रमास शाळा समिती सदस्य श्री. चंद्रकांत पाटील सर, श्री. अरविंद निकम सर, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, निमंत्रित सदस्या रणवरे मॅडम, सौ. सावंत मॅडम उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमास पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

मुख्याध्यापक श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या परिश्रमाने कार्यक्रम पार पडला.

सूत्रसंचालन तेजस्विनी शिंदे यांनी केले, तर सुवर्णा घनवट यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!