आशियामधील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अंबानी कुटुंबीय, मिस्त्री-हिंदुजां या स्थानावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.१: आशियातील २० श्रीमंत
कुटुंबांकडे सुमारे ३४.२६ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. याबरोबरच प्रथम
क्रमांकावर भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आहेत. ब्लूमबर्गच्या यादीत २०
कुटुंबांचा समावेश असून यात आणखी दोन कुटुुंबांची नावे आहेत. शापूरजी
पालनजी मिस्त्री यांची संपत्ती १.६३ लाख कोटी रुपये इतकी असून ते ८ व्या
स्थानी आहेत. तर सुमारे १. १२ लाखांची संपत्ती असलेले हिंदुजा कुटुंब १६
व्या स्थानी आहेत. अंबानी २०१९ मध्ये ३.७३ लाख कोटी रुपये संपत्ती होती.
तेव्हाही तेथे पहिल्याच क्रमांकावर होते.

एका
वृत्तानुसार, कोरोनाच्या उद्रेकातही अंबानी यांच्या संपत्तीत १.८५ लाख
कोटी रुपयाची वाढ झाली आहे. साधारणपणे या २० कुटंबात वर्षभरात ७४ हजार कोटी
रुपयाची वाढ झाली आहे. कोरोनामुळे रियल इस्टेट व फायनान्समध्ये आलेल्या
मंदीमुळे यातील निम्म्या कुबेरांना नुकसान झाले आहे. उदा. थायलंडचे
चेरावेनॉँट व हाँगकाँगच्या अब्जाधीश कुटुंबाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत
रियल इस्टेट डेव्हलपमेंट होते. कोरोनामुळे श्रीमंत-गरिबांतील अंतर आणखी
वाढले आहे.

यामुळे
सर्वसामान्य नागरिकांत असंतोष पसरला आहे. थायलंडमध्ये राजेशाहीला विरोध हाच
मोठा पुरावा आहे. कोरोना पसरत गेल्याने असमानता वाढत गेली. सामाजिक भेदभाव
आणि संधी नसल्याने त्यांच्यात निराशा आणखी वाढत गेली.

यादीत समाविष्ट प्रमुख तीन कुटुंबे आणि त्यांची संपत्ती

अंबानी कुटुंब

भारत

संपत्ति – 5.62 लाख कोटी रुपये

क्वॉक कुटुंब

हाँगकाँग

संपत्ति – 2.44 लाख कोटी रुपये

चेरावेनाँट कुटुंब

थायलंड

संपत्ति – 2.35 लाख कोटी रुपये


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!