एवढ्या वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा; स्वतःचा कारखाना व बँक सुद्धा चालवायला दिली : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 25 जानेवारी 2024 | फलटण | तुम्ही एवढी वर्ष राजकारणामध्ये कार्यरत आहात तर एवढ्या वर्षांमध्ये फलटणसाठी तुम्ही काय केलं ते आधी सांगावे व मगच टीका करावी. स्वतःचा असलेला कारखाना व बँक सुद्धा तुम्ही चालवायला दिली आहे; अशी खरमरीत टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या 30 वर्षांपासून फलटण तालुक्याचे तुम्ही नेतृत्व करत आहात. तालुक्यामध्ये असलेल्या कोणत्या संस्था तुम्ही जिवंत ठेवल्या आहेत. स्वतःचा असलेला कारखाना व बँक सुद्धा तुम्ही चालवायला दिली असून फलटण तालुक्यामध्ये मी खासदार झाल्यापासून विविध विकासकामे केली आहेत. त्यामध्ये नाईकबोमवाडी एमआयडीसी मध्ये माझी किंवा कुटुंबांची जागा शोधली तर फक्त ३० ते ४० एकरच सापडेल; अशी सडकून टीका खासदार रणजितसिंह यांनी केली.

जो निरा देवधर प्रकल्प हा पूर्ण होवू नये म्हणून तुम्ही कायम प्रयत्नशील होता. त्या खात्याचा मंत्री असताना सुद्धा तुम्ही हा प्रकल्प पूर्ण होवू दिला नाही. किंबहुना हा प्रकल्प पूर्णच होवू नये; याची काळजी तुम्ही घेत आला आहात आणि आता प्रकल्प पूर्ण होत आहे; तर तुम्हाला बघवत नाही; असेही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकदम निकटचे मित्र आहेत. असे मित्र सर्वांना लाभले पाहिजेत. आमदार जयकुमार गोरे यांनी जर ठरवले असते त्यांच्या स्वतःच्या घरातील कुणालाही खासदार करू शकत होते. त्यांनी फक्त मित्राला खासदार करायचे म्हणून मला सर्वतोपरी मदत केली आहे. आता तुम्हाला म्हणत फिरावे लागत आहे की आता तरी आमच्या घरात खासदार करा; असेही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!