दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘५ सप्टेंबर’ हा दिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून कृषि महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ‘कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव’ या कार्यक्रमांतर्गत आंदरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी येथे ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचा प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्ज्वलाने झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाळे सर, त्याचबरोबर सुतार सर आणि इतर सहकारी शिक्षक हे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव केला. कृषीदूत सुजित कन्हेरे याने आपल्या मनोगतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरित्राविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत अभिजीत भानवसे, समाधान चव्हाण, सुशांत खांडेकर, शंकर शिंदे आणि गणेश साबळे आदी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे आभार कृषीदूत प्रशांत खोकले याने मानले.