
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
बांबू लागवड कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था सदस्य व माजी अध्यक्ष कृषिमूल्य आयोग पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यासाठी दुपारी २ वाजता पंचायत समिती, फलटण येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि), ग्रामसेवक, विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी या एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
